दलितांवरील बहिष्कार मागे

September 21, 2010 10:36 AM0 commentsViews: 1

21 सप्टेंबर

पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात, दलित बांधवांवर बहिष्कार टाकण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 'आयबीएन-लोकमत'ने हा मुद्दा उचलून धरला. आम्ही उघडकीस आणलेल्या बातमीचा परिणाम आता दिसू लागला आहे. अखेर गावकर्‍यांनी आपली भूमिका बदलली आहे.

दलितांसोबत एकाच विहिरीवर पाणी भरण्याची तयारी आता गावकर्‍यांनी दाखवली आहे.

या गावातील दलित बांधवांनी सगळी बंधने झुगारुन सार्वजनिक विहिरीवर पाणी भरले. तसेच गावातील भैरवनाथ मंदिरात प्रवेश केला. त्यामुळे गावातील सवर्णांनी या दलितांवर बहिष्कार टाकला.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादासाठीही या दलित बांधवांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. पण दलितांनी दिलेल्या लढ्यामुळे हे चित्र आता बदलू लागल्याचे दिसत आहे.

close