औरंगाबादमध्ये मोराची शिकार

September 21, 2010 11:10 AM0 commentsViews: 73

21 सप्टेंबर

आपल्याकडे मोरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या शिकारींचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात आज एक मोर मृत अवस्थेत आढळून आला.

या मोराचे पंख छाटण्यात आले होते. पंखांसाठीच या मोराची शिकार झाल्याचा अंदाज आहे. शहरातील हिमायतबाग, विद्यापीठ परिसर, जटवाडा, हर्सुल या ठिकाणी मोरांचा वावर आहे.

मात्र या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोरांच्या शिकारीचे प्रकार घडतात. त्यामुळे या परिसरातील मोरांची संख्या कमी होत आहे.

close