लातूरसाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

September 21, 2010 11:24 AM0 commentsViews: 3

21 सप्टेंबर

लातूर जिल्ह्यातील विकासकामांना निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती.

त्यामुळे लातूर जिल्ह्यातील आमदारांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक बैठक सह्याद्री अतिथीगृहात घेतली.

यावेळी सध्या मंजूर झालेली आणि निधीअभावी रखडलेली जी कामे आहेत, त्यासाठी लागणारा निधी त्वरीत सुपूर्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

close