एसबीआय आणि आयसीआयसीआयचे व्याजदर ‘ जैसे थे ‘

October 27, 2008 1:09 PM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर, मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेनं दुसर्‍या तिमाहीचे रिझल्ट जाहीर केले आहेत. सध्यातरी एसबीआयनं व्याजदरात कोणतीही कपात होणार केलेली नाही. यावेळी बँकेचा नफा 40 टक्क्यांनी वाढून 2260 कोटी रुपये झालाय तर बँकेच्या व्याजदरातही 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातली सर्वात मोठी खाजगी बँक आयआयसीआय बँकेचे दुसर्‍या तिमाहीतले रिझल्टही चांगले आले आहेत. बँकेचा नफा यावर्षी वाढून 1 हजार 14 कोटी झाला. मात्र यंदाच्या तिमाहीच्या रिझल्टमध्ये बँकेची डिपॉझिट्स दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचं बँकेच्या जॉईंट एमडी चंदा कोचर यांनी सांगितलं. सध्यातरी बँकेच्या व्याजदरात कोणतीही कपात केली जाणार नाही.

close