दिल्लीत ओव्हरब्रीज कोसळून 23 जखमी

September 21, 2010 11:40 AM0 commentsViews: 6

21 सप्टेंबर

दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमजवळ ओव्हरब्रीज कोसळून 23 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर असल्याचे दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले.

जखमी झालेल्यांमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्टेडियमजवळच्या पार्किंगच्या जागेजवळच हा पूल कोसळला. उद्घाटन सोहळा याच ठिकाणी होणार होता.

या ओव्हरब्रीजचे कॉन्टॅक्ट पी ऍन्ड आर इंजीनिअरिंग वर्कस् या चंदीगडच्या कंपनीकडे होते.

close