सरकारकडून 22 साखर कारखान्यांना कर्जहमी

September 21, 2010 11:44 AM0 commentsViews: 1

21 सप्टेंबर

कर्जहमीअभावी बंद पडलेल्या 44 साखर कारखान्यांपैकी 22 कारखान्यांना तब्बल 188.63 कोटींची कर्जहमी दिल्यामुळे येत्या ऊस गाळप हंगामात हे कारखाने सुरू होणार आहेत.

तर उरलेल्या 22 कारखान्यांपैकी 7 कारखान्यांनी स्वत:च कर्जहमीची रक्कम उभारल्याने ते कारखानेही सुरू करता येणार आहेत.

तर उर्वरित 15 कारखान्यांचा ऊस मात्र इतर कारखान्यांनी उचलावा, असे निर्देश राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहेत.

त्यामुळे अधिकाधिक ऊसाचे गाळप करता येणार आहे. येत्या ऊस गाळप हंगामात राज्यात कोणत्याही शेतकर्‍याचा ऊस गाळपाशिवाय राहू नये, यासाठीच्या नियोजनासाठी एक बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.

close