पोस्टरवर नाव छापण्यावरून दोघांचा खून

September 21, 2010 11:51 AM0 commentsViews: 2

21 सप्टेंबर

गणेश मंडळाच्या पोस्टरवर नाव छापले नाही म्हणून दोन भावांची हत्या करण्यात आल्याची घटना पायधुनी परिसरात घडली आहे.

शरद आणि भरत मातेकर या दोघा भावांची, तलवार आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली. संतोष, नवीन गोळे आणि परमेश्वर पुणेकर या तिघांनी ही हत्या केल्याचे समजते.

गणेश मंडळाच्या पोस्टरवर नाव आणि फोटो छापण्यावरून, या दोघा भावांशी, तिघांचा वाद झाला होता. रात्री उशिरा गणेश मंडळाच्या मंडपाबाहेरच दोघा भावांवर हल्ला करण्यात आला.

close