अंध मुले साकारणार मल्लखांब

September 21, 2010 2:02 PM0 commentsViews: 29

प्राची कुलकर्णी, पुणे

21 सप्टेंबर

ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरया चा जयघोष… विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यातील रस्त्या-रस्त्यावर हेच चित्र पाहायला मिळते. पण यंदाच्या गणेशोत्सवात केसरी वाड्याच्या गणपतीसमोर एक खास गोष्ट पहायला मिळणार आहे. ती म्हणजे, पुण्यातील अंध शाळेतील मुले यंदा या मंडळासमोर मल्लखांबाचे खेळ सादर करणार आहेत.

मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून त्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. गेल्या वर्षभरापासून त्यांची ही तयारी सुरू आहे. त्यांची ही प्रात्यक्षिके सादर होणार आहेत, मानाच्या पाचवा गणपती असणार्‍या केसरी वाड्याच्या गणेश मंडळासमोर.

अर्थात त्यांना हे शिकवणे सोपे नव्हते. पण ही जबाबदारी पेलली श्रीनिवास हवालदार यांनी. आता अनेक लोकांसमोर परफॉर्म करायला मिळणार असल्याने ही मुलेही एक्साईटेड आहेत.

close