बाप्पा गेले गावाला…

September 22, 2010 8:10 AM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

गणेशभक्तांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन अखेर लाडके बाप्पा गावाला आपल्या गावाला निघून गेले आणि 'चैन पडेना आम्हाला', अशी विरहाची भावना भक्तांनी अनुभवली.

राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी उत्सवी मिरवणुका निघाल्या. ढोलताशांच्या दणदणाटात, गुलालाच्या उधळणीत, गणेशभक्त नाचात रंगून गेले. अवघे वातावरण गणपतीमय होऊन गेले.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई, पुण्यातील विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत.

मुंबईत गिरगाव चौपाटीवर सकाळपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन झाले.

पुण्यात मंडईतील टिळक पुतळ्याला हार घालून गणपतीची आरती करुन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

नाशिक, औरंगाबाद, नाशिक, पुणे इथेही शांततेत पण मोठ्या कडेकोट बंदोबस्त विसर्जन पार पडले.

विसर्जनाला गालबोट

विसर्जनाच्या उत्साहाला राज्यात गालबोट चंद्रपूर आणि नाशिकमध्ये गालबोट लागले. चंद्रपूरमध्ये अंबोरा तलावात विसर्जन करताना सहा जणांचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्येही 4 जण बुडाले.

close