तिस-या टेस्टसाठी कॅप्टन अनिल कुंबळे फिट

October 27, 2008 1:36 PM0 commentsViews: 18

दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणा-या तिस-या टेस्टसाठी कॅप्टन अनिल कुंबळे फिट झाला आहे. अनिल टेस्टसाठी फिट असेल तर अमित मिश्राला वगळण्यात येईल असं भारतीय टीम मॅनेजमेंटनं सांगितलंय. खांद्याच्या दुखापतीमुळे कॅप्टन कुंबळे मोहाली टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्यानं दिल्ली टेस्टसाठी सज्ज झाल्याचं मॅनेजमेंटनं सांगितलं आहे.

close