जळगावात मुलींनी काढली बाप्पाची मिरवणूक

September 22, 2010 12:20 PM0 commentsViews: 1

22 सप्टेंबर

मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिलांचा समावेश तसा नेहमीचाच…पण आता राज्याच्या इतर भागांमध्येही महिला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ लागल्या आहेत.

जळगावमध्ये तर मुलींनीच बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली. तब्बल साडेचारशे मुली या मिरवणुकीत सहभागी झाल्या.

राज्यातील 8 शहरांमधून जळगावात शिकण्यासाठी आलेल्या या मुलींनी यंदाचा गणेशोत्सव एकदम धूमधडाक्यात साजरा केला. रक्तदानासारखे सामाजिक उपक्रमही त्यांनी गेल्या 10 दिवसांत राबवले.

close