राहुल राजच्या प्रश्नावर बिहारी नेत्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

October 27, 2008 2:33 PM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर, दिल्लीमुंबईच्या बेस्ट बसमध्ये अंदाधुंद गोळीबार करणारा राहुल राज मुंबई पोलिसांच्या कारवाईत मारला गेला. हा तरुण मूळचा बिहारचा होता. दोन दिवसांपूर्वीच तो मुंबईतआला होता. दरम्यान, मुंबईत घडलेल्या घटनेचे दिल्लीपर्यंत पडसाद उमटले आहेत. या प्रश्नावर सर्व बिहारच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली आहे. या प्रकरणात राज्य सरकारनं योग्य कारवाई केली नाही, असं केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पंंतप्रधान मनमोहन सिंग यांची बिहारमधील नेत्यांची शिष्टमंडळानं भेट घेऊन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. ' राहुल राजवर गोळीबार करण्याऐवजी त्याला अटक करायला हवी होती. त्याच्या हातात पिस्तुल होतं. पण अटक झाल्यानंतर अधिक माहिती मिळाली असती. त्यानं हे कृत्य का केलं, हे कळलं असतं. टीव्हीवरील फुटेज पाहता त्याला गोळी मारायला नको होती ', अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तर लालूप्रसाद यादव यावेळी म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारची उदासिनता यातून दिसून येत आहे. राहुल राजची हत्या करण्यात आली आहे. तो दहशतवादी नव्हता. याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे'. या घटनेची माहिती घेण्यासाठी नितीशकुमार यांनी सीआयडीच्या अधिकार्‍याला मुंबईत पाठवलं आहे.

close