ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये कमबॅक करेल – स्टीव्ह वॉ

October 27, 2008 2:41 PM0 commentsViews: 9

स्टीव्ह वॉ भारतात आला आहे. फिरोजशहा कोटला येथे चाललेल्या ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या सराव त्यांने पाहिला. क्रिकेट तज्ञांच्यामते या बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीत भारताचं पारडं जरी जड असलं तरी स्टीव्ह वॉला मात्र पूर्ण विश्वास आहे की ऑस्ट्रेलिया या सीरिजमध्ये कमबॅक करेल. स्टीव्ह वॉला रिटायर होऊन आता जवळ जवळ चार वर्ष झाली आहेत पण अजूनही त्याच्या शब्दांना आणि सूचनांना ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये तितकीचं वजन आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया टीममधल्या नवख्या खेळाडूंना टिप्सही दिल्या.

close