पाक क्रिकेटमधील वाद संपेनात

September 23, 2010 11:01 AM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा हा सर्वांनाच लक्षात राहील. कारण पाकिस्तान क्रिकेटमधील आणि त्यांच्या खेळाडूंचे वाद संपण्याची चिन्ह नाहीत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता पाकिस्तानचे खेळाडू बॉल टॅम्परिंगच्या जाळ्यात अडकलेत.

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरने बॉल टॅम्परिंग केल्याचे आता उघड झाले आहे.

बुधवारी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या तिसर्‍या वन डेत अख्तरने बॉलच्या सीमवर हाताने टॅम्परिंग केल्याचे उघड झाले आहे.

इतकेच नाही, तर त्यानंतर स्पाईक शूज घालून तो बॉलवर उभा राहिल्याचेही उघड झाले आहे.

close