बीबीसी स्पोर्ट्सचा कॉमनवेल्थवर फोकस

September 23, 2010 11:47 AM0 commentsViews: 3

23 सप्टेंबर

बीबीसी स्पोर्ट्सने प्रसिद्ध केलेल्या फोटोनंतर कॉमनवेल्थ व्हिलेजच्या अवस्थेची चर्चा आता जागतिक पातळीवर सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत बीबीसीच्या टीमने हे फोटो काढले आहेत.

यामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या बाथरूमची अवस्था, बेडवर प्राण्यांच्या पायांचे ठसे, बिल्डिंगबाहेर लटकत असलेल्या इलेट्रिक वायर्स या सगळ्यांचे फोटो काढण्यात आलेत.

तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंड आपली 22 जणांची ऍथलिट टीम भारतात पाठवणार होती. पण त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदल्याचे समजते.

close