खेळाडूंची माघार सुरूच…

September 23, 2010 1:21 PM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर

कॉमनवेल्थ स्टेडिअम्सच्या निकृष्ट बांधकामावरुन आयोजन समितीवर ताशेरे ओढले जात असतानाच या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माघार घेण्याचे प्रकार सुरुच आहेत.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणार्‍या कॅनडाच्या महिला हॉकी टीमने आणि दोन शूटींग ऍथलिट्सनी दोन दिवस उशिराने भारतात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते दिल्लीसाठी कॅनडाहून रवाना होणार होते. पण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आणि सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

या अगोदरच कॅनडाच्या केवीन टॅट्रीन आणि दिएत्मार ट्रिलस या तिरंदाजांनी कॉमनवेल्थ गेम्समधुन माघार घेतली आहे. त्याचबरोबर कॅनडाच्या टीमसोबत असणारे सपोर्ट स्टाफही दोन दिवस उशिराने दिल्लीत दाखल होणार आहे.

न्यूझीलंडचा खेळाडूंना सल्ला

न्यूझीलंड ऑलिम्पिक कमिटीनेेही आपल्या ऍथलेट्सना 28 सप्टेंबरपर्यंत दिल्लीला प्रवास करू नका, असा सल्ला दिला आहे. लॉन बॉल, हॉकी आणि बॅडमिंटनची टीम या आठवड्यात दिल्लीत दाखल होणार होती.

न्यूझीलंड ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष माईक स्टेनले आणि महासचिव बॅरी मायस्टर आज दिल्लीवरून न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. एकंदरीत गेले तीन दिवस चाललेल्या कॉमनवेल्थ वादावर सगळ्या देशांनी वेट ऍण्ड वॉच भूमिका घेतली आहे.

close