अजब लग्नाची गजब गोष्ट प्रदर्शनासाठी सज्ज

September 23, 2010 2:15 PM0 commentsViews: 10

भाग्यश्री वंजारी, मुंबई

23 सप्टेंबर

अजब लग्नाची गजब गोष्ट हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेगळी कथा आणि त्यानुसार त्याची वेगळी हाताळणी, हे या सिनेमाचे वैशिष्ट्य मानले जात आहे.

शिवदर्शन आणि अमित या जोडीने हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी याच जोडीने कॅनव्हास हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला होता.

अभिनेता उमेश कामत आणि सई ताम्हणकर ही जोडी आत्ता पर्यंत छोट्या पडद्यावर पहायला मिळाली…पण पहिल्यांदाच ती या सिनेमातून एकत्र येत आहे.

सिनेमाची संकल्पना ऐकली तर पटकन लक्षात येतो तो हॉलीवूडचा माय वाईफ इज अ गँगस्टर हा सिनेमा…

हॉलीवूडच्या या सिनेमावर हा सिनेमा आधारल्याची चर्चा आहे. अर्थात लेखक-दिग्दर्शक मात्र या चर्चा साफ नाकारल्या आहेत.

उद्या हा सिनेमा रिलीज होत आहे, तेव्हा पाहायचे ही अजब कथा प्रेक्षकांच्या किती पचनी पडतेय ते…

close