‘स्वाभिमान’च्या वाहतूक सेना अध्यक्षावर हल्ला

September 23, 2010 5:35 PM0 commentsViews: 3

23 सप्टेंबर

स्वाभिमान संघटनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांच्यावर आज हल्ला झाला. नितेश राणेंनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला.

स्वाभिमान संघटनेच्या खारमधील ऑफिसमध्ये ही घटना घडली. सध्या चिंटू शेखवर पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

यासंदर्भात खार पोलीस स्टेशनमध्ये 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये नितेश राणेंचेही नाव आहे. चिंटू शेखने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.

close