राणी मुखर्जीची वादग्रस्त जमीन पुन्हा चर्चेत

September 24, 2010 9:24 AM0 commentsViews: 5

24 सप्टेंबर

बॉलीवूड स्टार राणी मुखर्जीच्या शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. या व्यवहार प्रकरणी तत्कालीन 4 तलाठी आणि 1 मंडल अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश, जिल्हाधिकार्‍यानी दिले आहे.

हक्क भंग झालेला असताना, जमिनीची खरेदी-विक्री झाली कशी, असा प्रश्न नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी केला आहे.

शिर्डीतील हॉटेल सन ऍन्ड सॅण्ड शेजारी, अभिनेत्री राणी मुखर्जीने जमीन खरेदी केली होती. पण ती जमीन शर्थीची होती. त्यामुळे या प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला होता.

close