पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

September 24, 2010 10:48 AM0 commentsViews: 5

24 सप्टेंबर

रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणला आहे. बँकेच्या जिल्ह्यातील 14 आणि मुंबईतील 3 शाखांमधील व्यवहार थांबवण्यात आला आहे.

त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बँकेत 700 कोटींच्या ठेवी आहेत, आता बँकेच्या एकेका खातेदाराला दररोज 1 हजार रुपये देणार असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

बँकेच्या कर्जत शाखेबाहेर जमलेल्या ठेवीदारांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून माजी राज्यमंत्री प्रभाकर धारकर यांचे पुत्र शिशीर धारकर बँकेच्या चेअरमनपदी आहेत.

विशेष म्हणजे राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरेंच्या जिल्ह्यात रोहा-अष्टमी बँक आणि गोरेगाव अर्बन बँकेनंतर पेण अर्बन बँक आर्थिक अडचणीत आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

close