अपघाताबद्दल पोलीस स्टेशनसमोर आंदोलन

September 24, 2010 10:57 AM0 commentsViews: 3

24 सप्टेंबर

अपघात करून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ड्रायव्हरला अटक न केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पोलीस स्टेशनसमोरच आंदोलन केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला.

औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.

19 तारखेला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू ओढवला होता आणि एक व्यक्ती जखमी होती.

नागरिकांनी हा मृतदेहच पोलिसांसमोर आणून ठेवला.

19 सप्टेंबरला हेमा इंगळे आणि त्यांच्या पत्नी रत्नपुष्पा इंगळे यांना माणिक राजळे या कॉन्ट्रक्टरने स्कॉर्पिओ गाडीने उडवले होते.

त्याच रात्री रत्नपुष्पा इंगळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान काल रात्री हेमा इंगळे यांचाही मृत्यू झाला.

पण वाळूज एमआयडीसी पोलिसानी माणिक राजळे याला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.

त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अखेर हेमा इंगळे यांचा मृतदेहच पोलीस ठाण्यासमोर ठेवला.

close