शहरयार यांना ज्ञानपीठ पुरस्कार

September 24, 2010 11:11 AM0 commentsViews: 1

24 सप्टेंबर

दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीए..बस एक बार मेरा कहाँ मान लिजीए…या गाण्यानं लाखो सिनेरसिकांना घायाळ करणार्‍या, तसेच सीनेमें जलन आँखो मे तुफान सा क्यूँ है? इस शहरमें हर शक्स परेशान सा क्यूँ है? या 'आम आदमी'च्या भावना काव्यातून व्यक्त करणार्‍या ज्येष्ठ उर्दू कवी अखलक मोहम्मद खान उर्फ शहरयार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

2007 आणि 2008 सालच्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्यात शहरयार यांना 2008 या वर्षाचा 44 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात उर्दू शिकवणार्‍या शहरयार यांचे उर्दू साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध गझला आणि सिनेमागीते लिहिली आहेत.

धूप की दिवारें, कहीं कुछ कम है, इझ्म-ए-आझम, सातवाँ दार, नींद की सरहद, शाम होनेवाली है, हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

तर मल्याळम कवी ओ. एन. पी कुरुप यांना 43 व्या 'ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्यापूर्वी फिराक गोरखपुरी, कुर्तुल-एन-हैदर आणि अली सरदार जाफरी या उर्दू कवींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता.

मल्याळम कवी ओ. एन. पी कुरुप यांना त्यांच्या मल्याळम साहित्यातल्या योगदानाबद्दल 43 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुरुप हे पाचवे मल्याळम साहित्यिक आहेत.

close