कांद्याला मागणी वाढली

September 24, 2010 11:36 AM0 commentsViews: 2

24 सप्टेंबर

पाकिस्तान आणि दक्षिण भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानातून आखाती देशांना होणारी कांदा निर्यात ठप्प झाल्याने, भारतीय कांद्याची मागणी जागतिक बाजारपेठेत वाढली आहे.

ही मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा पूर्ण करत आहे.

नाशिकच्या घाऊक बाजारात कांदा प्रति क्विंटल चौदाशे रुपये दराने विकला जात आहे.

close