रायगडमध्ये भातावर रोग प्रादुर्भाव

September 24, 2010 11:49 AM0 commentsViews: 26

24 सप्टेंबर

हवामानात होणार्‍या रोजच्या बदलांमुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीवर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

शेतकर्‍यांनी याबाबत कृषी खात्याला कल्पना देऊनही शासनाकडून किटकनाशकांचा पुरवठा होत नाही.

या रोगामुळे भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे.

यावर वेळीच उपाय केले नाहीत, तर भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

close