मालवाहतूक संघटनेचा टोलविरोधी इशारा

September 24, 2010 11:54 AM0 commentsViews: 7

24 सप्टेंबर

सातारा-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरच्या चारही टोल नाक्यांवरील टोल न भरण्याचा इशारा मालवाहतूक संघटनेने दिला आहे. गांधी जयंतीपासून ते टोल भरणार नाहीत.

पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या मालवाहतूक संघटनांची , सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासोबत बैठक झाली.

पालकमंत्र्यांनी यावेळी टोल संदर्भात मुख्यमंत्री आणि नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

close