पुण्यात ‘देणे समाजाचे’ कार्यक्रम

September 24, 2010 12:59 PM0 commentsViews: 16

24 सप्टेंबर

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या संस्थांबाबत आपण ऐकत असतो. पण अनेक संघटना अशाही असतात, ज्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही.

अशा सगळ्या संस्थांच्या कामाविषयी माहिती व्हावी, ते करत असलेल्या कामाविषयी लोकांनी जाणून घ्यावे, यासाठी 'देणे समाजाचे' या कार्यकमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पुण्यातील मनोहर मंगल कार्यालयात हे प्रदर्शन पुढचे तीन दिवस सुरु राहणार आहे.

वेगवेगळ्या सामाजिक संस्थांविषयी आणि त्यांच्या कामाविषयीची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. प्रदर्शनाचे यंदा सहावे वर्ष आहे.

close