भारताची झाली बेअब्रू…

September 24, 2010 1:42 PM0 commentsViews: 4

24 सप्टेंबर

जगभरातील क्रीडारसिकांचे ज्याकडे लक्ष लागलेले असते, विविध देशांचे खेळाडू ज्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले क्रीडानैपुण्य दाखवतात, ती कॉमनवेल्थ स्पर्धा भरवण्याचा मान अखेर भारताला मिळाला.

बराच गाजावाजा करत या स्पर्धेची राजधानी दिल्लीत तयारी सुरू झाली. पण अखेर देशातील भ्रष्टाचाराची कीड या स्पर्धेलाही लागली. आणि स्पर्धा होण्यापूर्वीच स्टेडियमच्या, तयारीच्या अर्धवट आणि नित्कृष्ट कामांच्या बातम्या जगभरात पोहोचल्या.

अनेक देशांच्या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला. यामुळे देशाची बेअब्रू झाली आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांनी 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या.

'बिनधास्त बोला' या कार्यक्रमात कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे भारताची लाज गेली आहे का? या विषयावर शेकडो लोकांनी उत्स्फूर्त संवाद साधला…

या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बटनावर क्लिक करा.

close