तरुणीची जलशुद्धी परीक्षा…

September 24, 2010 2:24 PM0 commentsViews: 1

24 सप्टेंबर

रामायणात सीतामातेला जसे आपले पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्याप्रमाणेच आज एकविसाव्या शतकातही स्त्रीला आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आहे. हा प्रकार पाहायला मिळाला, अंबरनाथ शहरापासून दोन ते तीन किलोमीटरवरील बंजारा वस्तीत…

एक मुलगी आपल्या वस्तीतून दोन दिवस बाहेर होती. मात्र जेव्हा ती परत आली तेव्हा तिला समाजात परतण्यासाठी एका परीक्षेला सामोरे जावे लागले. बंजारा समाजाच्या पंचायतीने वस्तीबाहेर जंगल परिसरात एक पाच फुटाचा खड्डा खणून त्यात पाणी भरले. आणि या पाण्यात त्या मुलीला उडी घेण्यास सांगितले. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत बराच वेळ पाण्यात बुडून राहावे लागले.

त्यानंतर तिचे शुद्धीकरण झाले, असा निर्वाळा पंचायतीने दिला. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबाला तीन दिवसानंतर समाजात पुन्हा घेतले गेले. विशेष म्हणजे या कुटुंबाकडून पंचायतीने दंडही आकारला.

close