वाशिममध्ये लक्ष्मीपूजनाला खेळला जातो सारीपाट

October 28, 2008 8:13 AM0 commentsViews: 101

28 ऑक्टोबर, वाशीम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दिवाळीच्या काही वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. वाशिम जिल्ह्यातल्या भूली गावातही अशीच एक प्रथा आहे. या गावात लक्ष्मीपूजनाला द्यूत अर्थात सारीपाट खेळण्याची जुनी परंपरा आहे. ती परंपरा आजही पाळली जाते. दिवाळीत खास मनोरंजनासाठी इथंसारीपाट खेळला जातो. दोन गटांमध्ये हा खेळ खेळला जातो. या खेळात 7 कवड्या आणि 16 सोंगट्यांचा समावेश असतो. 8 जणांच्या दोन गटांमध्ये हा खेळ खेळला जातो. अनेक वयस्कर माणसं इथं हा खेळ खेळतात. कॉम्प्युटर आणि मोबाईल गेम्सच्या या युगात सारीपाट तसा अनेकांना माहितही नसेल. पण या गावानं आजही ही परंपरा जपली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर क्षणाक्षणाला बदलणार्‍या या जगात आपल्या जुन्या परंपरा जतन करण्याच्या हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

close