लोक कला संमेलनाची उत्साही सुरुवात

September 24, 2010 3:09 PM0 commentsViews:

24 सप्टेंबर

मुंबईत आजपासून अखिल भारतीय लोक कला संमेलनाला सुरुवात झाली आहे. सिद्धीविनायक मंदिरापासून रवींद्र नाट्यमंदिरापर्यंत लोक कला संमेलनाची दिंडी काढण्यात आली.

या दिंडीचे वैशिष्ठ्य म्हणजे वाद्यांची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली.

लोक कलेचा आणि लोक वाद्यांचा प्रवास रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी गोंधळामध्ये वापरण्यात येणारे संबळ, जागरणामध्ये वापरण्यात येणारी दिमडी, तमाशात वापर्‍यात येणारी ढोलकी पालखीत ठेवण्यात आली होती.

हे संमेलन रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.

close