राज्यातील वाळू उपशावर बंदी

September 24, 2010 5:08 PM0 commentsViews: 115

24 सप्टेंबर

राज्यात होणार्‍या वाळू उपशावर हायकोर्टाने तात्पुरती बंदी घातली आहे. नदीपात्राचे नुकसान होत असल्याने कोर्टाने वाळू उपशाचे परवाने असणार्‍यांनाही बंदी घातली आहे.

तसेच महसूल खात्याच्या सचिवांनी तातडीने सर्व जिल्हाधिकार्‍यांना फॅक्स किंवा ई-मेलद्वारे वाळू उपसा बंद करण्याच्या सूचना करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

वाळू उपशामुळे राज्यातील नद्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्यामुळे पुराचा धोकाही वाढल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. पुढचे आदेश मिळेपर्यंत वाळू उपसा थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

सागर श्रमिक हातपाटी वाळू उत्पादक संघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे आदेश दिले.

close