गोळीबारावरून राणे विरुद्ध शिवसेना

September 24, 2010 5:24 PM0 commentsViews:

24 सप्टेंबर

स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांच्यावर झालेल्या गोळीबारावरून आता नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. नितेश राणे यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला होता.

पण त्यांना झालेली जखम ही बंदुकीच्या गोळीने झाली नसल्याचे मेडीकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक रिपोर्टमधून ही माहिती मिळाली असली तरी अजून अंतिम रिपोर्ट यायचा आहे.

शेखवर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण ही जखम गोळीमुळे झाली नसल्याचे हिरानंदानी हॉस्पिटलने म्हटले आहे. पण आता या प्रकरणावरून नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण जुंपले आहे.

दरम्यान या सर्व प्रकारामागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप नारायण राणे केला आहे.

तर शिवसेना षडयंत्र रचत नाही तर थेट भूमिका मांडते, या शब्दात नीलम गोर्‍हे यांनी नारायण राणेंना उत्तर दिले आहे. आज त्यांनी चिंटू शेख यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

close