कलमाडींना जबाबदारी ‘कबूल’

September 25, 2010 10:48 AM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर

कॉमनवेल्थच्या आयोजनावर अगदी जागतिक पातळीवर गदारोळ झाल्यानंतर अखेर संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आयोजनातील उणीवांची जबाबदारी स्वीकारली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जाताना कलमाडींनी ही कबुली दिली. संयोजन समितीचे अध्यक्षपद माझ्याकडे असल्याने मी जबाबदारी स्वीकारतो, असे ते म्हणाले.

याचवेळी मैदाने उशिरा ताब्यात मिळाल्याने कामे पूर्ण होण्यास उशीर झाली, अशी सबबही त्यांनी सांगितले.

यासोबतच तीन ऑक्टोबरला होणार्‍या उदघाटनापूर्वी ही कामे पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत अध्यक्ष माईक फेनेलही उपस्थित होते.

close