अयोध्या प्रकरणी सुनावणी तीन न्यायाधिशांसमोर

September 25, 2010 11:04 AM0 commentsViews: 4

25 सप्टेंबर

रमेशचंद्र त्रिपाठी यांच्या याचिकेवर, आता सरन्याधिशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी तीन न्यायधिशांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

यामध्ये सरन्याधीश कपाडिया, न्यायमूर्ती अफताब आलम आणि न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांचा समावेश आहे.

28 सप्टेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

अयोध्या विवादीत जमीन प्रकरणाचा निकाल लांबणीवर टाकावा आणि न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी याचिका रमेशचंद्र त्रिपाठी यांनी केली आहे.

close