टोलविरोधात मनसे, काँग्रेस एकत्र

September 25, 2010 11:10 AM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर

औरंगाबाद पैठण रस्त्यावरील टोलनाका बंद करण्यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. पण या आंदोलनाच्या काळातही नाक्यावरील टोलवसुली सुरूच होती.

जमावबंदीचा आदेश लागू करून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मज्जाव केल्याने टोलवसुली थांबली नाही. काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा लावत टोलनाक्याला संरक्षण दिले.

जनतेचे आंदोलन असूनही पोलिसांनी टोलनाक्याचे संरक्षण करण्याची भूमिका निभावली. त्यामुळे आंदोलन सुरू असतानाही टोलवुसली सुरूच होती.

हा टोलनाका बंद करण्याची मागणी काँग्रेस आणि मनसेने केली आहे. मनसेने तर यापुढंील आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्याचा इशारा दिला आहे.

close