नवी मुंबईत फार्मास्युटिकल कंपनीच्या गोदामाला आग

October 28, 2008 8:18 AM0 commentsViews: 3

28 ऑक्टोबर, मुंबईनवी मुंबईतल्या म्हापे इंडस्ट्रीजमधील गोपालदास विश्राम अ‍ॅन्ड कंपनीच्या गोदामाला रात्री एकच्या सुमारास आग लागली. या इमारतीच्या तिन्ही मजल्यांना आग लागली. यात लाखो रुपयांचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. गोदामामध्ये औषधांचा साठा असल्यामुळं नुकसान वाढलं. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पाच बंब दाखल झाले होते.

close