पोलिसांना घर खाली करण्याची नोटीस

September 25, 2010 1:40 PM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर

जनतेचे संरक्षण करणार्‍या पोलिसांनाच ठाण्यात घराच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील पोलीस वसाहतीमध्ये राहणार्‍या पोलिसांना घर खाली करण्याची नोटीस म्हाडाने बजावल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.

ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील एकूण 10 इमारतींना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सुमारे साडे आठशे पोलीस कुटुंबांना दुसरीकडे जावे लागणार आहे. कुटुंबातील सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

स्थलांतरित झाल्यामुळे जीवनमानावर परिणाम होणार असण्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात शाळकरी मुलांचे नुकसान होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दिवसेंदिवस जागांचे भाव वाढल्यामुळे पोलीस वसाहत तोडून त्या ठिकाणी टॉवर बांधण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

close