‘मालेगाव पोलिसांच्या सुविधांसाठी प्रयत्न’

September 25, 2010 1:58 PM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर

मालेगावच्या पोलिसांना सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी केली आहे.

मालेगावमधील आझादनगर, आयेशानगर आणि शहर पोलीस स्टेशनची त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयींपासून पोलीस वंचित असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

मालेगावच्या पोलिसांना या मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येच्या निकानानंतर मालेगावसह राज्यात शांतता नांदेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

close