कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

September 25, 2010 2:09 PM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही आता आघाडी झाली आहे.

काँग्रेसला 55, तर राष्ट्रवादीला 52 जागा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला.

नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी ही बैठक झाली. त्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, वसंत डावखरे, गणेश नाईक या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते हजर होते.

पण रिपब्लिकन पक्षाला या आघाडीत थेटपणे स्थान दिले गेले नाही. आता शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट सामना होणार हे स्पष्ट झाले आहे.

close