लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव

September 25, 2010 2:57 PM0 commentsViews: 10

25 सप्टेंबर

गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव सुरू झाला आहे. राजाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या रोख रकमेची मोजणी झाली. त्यात आतापर्यंत पाच कोटी पाच लाख रुपये जमा झालेत.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली चांदीची छोटी मूर्ती 51 हजारांना विकली गेली.

विशेष म्हणजे या मूर्तीची किमान किंमत फक्त 700 रुपये ठेवण्यात आली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत हा लिलाव सुरू होता.

close