फुलांची आवक वाढल्याने किमतीत घट

October 28, 2008 8:25 AM0 commentsViews: 5

28 ऑक्टोबर, मुंबई दिवाळी म्हणजे फुलांचा सण. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांना दिवाळीत विशेष मागणी असते. फुलांचा बाजार गजबजून जातो. दिवाळीतल्या वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी फुलांना प्रचंड मागणी असते. पहाटेपासूनच ग्राहकांची फुलं खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. यावर्षी बाजारात फुलांची आवक प्रचंड वाढल्यामुळे त्यांची किंमत कमी झाली आहे. गुलाब, झेंडू आणि चमेली सारख्या रंगीबेरंगी फुलांनी फुलबाजारात एक वेगळीच रौनक आणली आहे.

close