स्वबळावरच लढणार रामदास आठवलेंचे स्पष्टीकरण

September 26, 2010 1:07 PM0 commentsViews: 7

26 सप्टेंबर

कल्याण – डोंबिवली महानगरपालिका निवडणूक स्वबळावरच लढवणार असल्याचे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच सेना-भाजपसोबत युती करणार नाही, असेही आठवलेंनी म्हटले आहे.

आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही, असे सांगत आठवलेंनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून अजूनतरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असंही आठवलेंचे म्हणण आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक रिडालोस मार्फत लढवावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ते न झाल्यास इथेही स्वबळावर लढणार असल्याचे आठवले यांची कोल्हापूरातल्या पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.

close