गोंदियात भुसामिश्रीत साखरेचा पुरवठा

September 26, 2010 1:15 PM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात ऐन सणासुदीच्या काळात कोंडा आणि भुसा- मिशि्रत साखरेचा पुरवठा करण्यात येत आहे.

जय महेश शुगर लिमिटेड या बीडच्या साखर कारखान्यातून गोंदीया जिल्हयात 1 हजार 62 क्विन्टल साखर मागवण्यात आली होती.

पण त्यातील साखरेत मोठ्या प्रमाणात भुसा असल्याचे उघड झाले. सडक अर्जुनी तालुक्यात स्वस्त धान्याची 112 दुकाने आहेत.

या तालुक्यातल्या धान्य दुकानांकरिता 24 ऑगस्टला 500 क्विंटल साखर मागवण्यात आली होती.

पण या साखरेमध्ये उसाच्या चिपाडांचा भुसा आणि कोंडा असल्याचे नागरिकांना आढळले.

त्यामुळे ही साखर विकत घेण्यास ग्राहकांनी नकार दिला आहे.

close