वाईन विषयीच्या गैरसमज शेतकार्‍यांना फटका

September 26, 2010 1:19 PM0 commentsViews: 6

26 सप्टेंबर

रवीवारी पुण्यातल्या द्राक्षउत्पादकांची परिषद पार पडली. या परिषदेत उत्पादकांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली.

या परिषदेला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

इतर उद्योगांना ज्याप्रमाणे मदत दिली जाते त्याप्रमाणे वाईन उद्योगालाही मदत मिळाली पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

तर दुसरीकडे वाईन उत्पादकांना पाठीशी घालत, वाईन विरोधी आंदोलनाचा फटका वाईन व्यवसायाला बसतोय असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

वाईन प्रश्नावर गैरसमजच जास्त असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे.

वाईनविरोधी आंदोलनामुळे वाईन उद्योगाला फटका बसत असल्याचे पवार म्हणाले.

पुण्यातल्या द्राक्षउत्पादकांच्या परिषदेत पवारांनी हे वक्तव्य केले.

close