युपीएससीच्या पूर्व परिक्षेत ऐच्छिक विषयाऐवजी होणार बुद्धिमत्ता चाचणी

September 26, 2010 1:31 PM0 commentsViews: 57

26 सप्टेंबर

प्रशासकीय सेवा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या वर्षीपासून भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच युपीएससीच्या पूर्वपरिक्षा अभ्यासक्रमातून ऐच्छिक विषय वगळण्यात येणार आहे.

या विषया ऐवजी बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात येईल. त्यामुळे प्राथमिक परिक्षेला बसणार्‍या सर्व उमेदवारांना समान अभ्यासक्रम असेल. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी पूर्वपरिक्षेसाठी सामान्य ज्ञान या विषयासोबत एक ऐच्छिक विषय घ्यावा लागत होता. यात 23 विषयांचा समावेश होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

यूपीएससी पूर्व परिक्षा नवीन अभ्यासक्रम

बुध्दिमत्ता चाचणी परिक्षा

इंग्रजी भाषा चाचणी

सामान्य ज्ञान

हे सर्व विषय बहुपर्यायी (objective) असतील.

close