जकात नाक्यावर मोठ्या प्रमाणात जकात चोरी

September 26, 2010 1:41 PM0 commentsViews: 11

गोंविद तुपे,मुंबई

26 सप्टेंबर

जकात नाक्यावर मोठ्या प्रमाणात जकात चोरी होत आहे, असे खुद्द मुंबई महापालिकाचे अधिकारी सांगत आहेत.

दुसरीक़डे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार जकात चोरी करणार्‍यांवर कडक कारवाई झाली असे दिसत नाही.

त्यामुळे जकात चोरांना महापालिका पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबई पनवेल हायवेवरचा हा मानखुर्दचा जकात नाका. याच नाक्यावर 15 डिसेंबर 2009 या एकाच दिवशी, अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात MH 06 , AC 9392 या नंबरच्या गाडीच्या दोन रिसिट बनवण्यात आल्या होत्या.

त्याही वेगवेगळ्या रकमेच्या मानखुर्दमधल्या महेश जाधव यांनी माहितीच्या अधिकाराखाली त्याचा शोध घेतला आणि धक्कादायक माहिती समोर आली.

मुंबईतल्या पाच जकात नाक्यांवरून एका महिन्यात तब्बल 30 ते 40 कोटीं रूपयांची जकातचोरी होत आहे. प्रत्यक्षात कितीतरी कोटी रुपयांची जकात बुडवली जाते.

तरीही अशा चोरांना मदत करणार्‍या जकात एजंटसवर कारवाई मात्र होतच नाही.

एकीकीडे महापालिका महिनाला करोडो रूपयांची जकात चोरी होत असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे गेल्या 14 वर्षात फक्त तेराच जकात एजंटवर कारवाई करण्यात आली.

त्यामुळे जकात चोरांना मदत करणार्‍या एजंटवर महापालिकेतील अधिकारी का मेहरबान आहेत. मनपाला जकातीतून मिळणारा करोडो रूपयांचा महसुल भलत्याच ठिकाणी जात आहे तर दुसरीकडे नुसतीच कागदी आश्वासन दिली जात आहे.

close