कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज निकृष्टच

September 26, 2010 1:56 PM0 commentsViews: 6

26 सप्टेंबर

कॉमनवेल्थसाठी उभारण्यात आलेल्या गेम्स व्हिलेजचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. भारतीय बॉक्सर अखिल कुमार गेम्स व्हिलेजमध्ये आपल्या रुममध्ये गेला असताना त्याचा बेड कोसळला.

सुदैवाने अखिलला मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. अखिल कुमारने गेल्या कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे.

त्याआधी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणार्‍या भारतीय बॉक्सर्सच्या टीमला गेम्स व्हिलेजमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल चार तास वाट बघावी लागली.

ऑलिम्पिक भवनमधुन गेम्स व्हिलेजमध्ये जाण्यासाठी ते निघाले होते, पण बस उशिराने पोहोचल्याने त्यांना ताटकळावे लागले.

त्यानंतर अखिल कुमार विश्रांतीसाठी आपल्या रुममधल्या बेडवर बसायला जात असतानाच बेड कोसळण्याची ही घटना घडली.

त्याच्या बेडला प्लायवूड नसल्याने ही घटना घडली. याशिवाय रुममधले बाथरुमही स्वच्छ नसल्याचे त्याने म्हटले आहे.

ही घटना त्याने आपले कोच गुरबक्ष सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली.

पटियालाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टमध्ये गेले एक महिना सराव करणारी भारतीय बॉक्सिंग टीम शनिवारी रात्री गेम्स व्हिलेजमध्ये दाखल झाली.

कॉमनवेल्थ गेम्ससाठी कोसळलेला ब्रीज बांधण्यासाठी लष्कराला विनंती

कॉमनवेल्थ गेम्ससाठी जवाहरलाल नेहरु स्टेडिअमबाहेर उभारण्यात आलेला फुटब्रीज नुकताच कोसळला होता. हा ब्रीज पुन्हा बांधण्यासाठी दिल्ली सरकराने लष्कराला विनंती केली आहे.

पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कॉमनवेल्थ संदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

21 सप्टेंबरला 95 मीटर लांबीचा हा फुटब्रीज कोसळला होता आणि यात 27 जण जखमी झाले होते. चंदीगढमधल्या एका कंपनीने हा ब्रीज बांधला होता.

close