मनसेच्या साह्याने लाखो लिटर खाद्य तेल जप्त

September 26, 2010 1:52 PM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर

ठाण्याच्या काल्हेर परिसरातील विधी एन्टरप्रयझेस कंपनीच्या गोडाऊनवर मनसेने पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. त्यात अत्यंत खराब क्वालिटीचे लाखो लिटर खाद्य तेल सापडले आहे.

आता अन्न आणि औषध प्रशासन यावर कारवाई करणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हे खराब तेल मुंबई आणि आसपासच्या परिसरात विकले जाणार होते.

यात खोबरेल तेल, तीळाचे तेल, शेंगदाणा तेल अशा तेलांचा समावेश आहे. याआधीही या गोडाऊनवर धाड टाकण्यात आली होती, आणि त्यावेळी जप्त केलेले खाद्यतेल अजुनही गोडाऊनमध्येच पडुन आहे.

close