अंबरनाथमध्ये मोठ्या आकाराचा पतंग आढळला

September 26, 2010 1:36 PM0 commentsViews: 1

26 सप्टेंबर

अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात एक मोठ्या आकाराचा पतंग आढळून आला आहे सर्प मित्र प्रकाश गोहिल यांना हा पतंग सापडला आहे.

या पतंगाची लांबी 9.4 इंच आहे. साधारण पतंगापेक्षा हा पतंग चार पट मोठा आहे. ही मादी असून, ते जायंट ऍटलस मॉथ प्रकारातील आहे.

या मादीने आत्तापर्यंत 100 अंडी घातली आहेत. हा दुर्मिळ पतंग बघण्यासाठी परिसरातील लोकांनी गोहिल यांच्या घरी गर्दी केली आहे. त्याला प्रकाश गोहिल बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सोडणार आहेत.

close