ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या मदतीला बिशनसिंग बेदी

October 28, 2008 8:37 AM0 commentsViews: 8

28 ऑक्टोबर, दिल्ली भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मोहालीत झालेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये भारतीय स्पिनर्सची कामगिरी उल्लेखनीय होती. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या 20 पैकी तब्बल 12 विकेट्स स्पिनर्संनी घेतल्या. मोहालीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं आता एक नवीन चाल रचली आहे. भारतीय स्पिनचं तंत्र जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियानं स्पिनचे जादूगार बिशनसिंग बेदींची मदत घ्यायचं ठरवलं आहे. फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या प्रॅक्टिस् सेशनमध्ये बेदींनी जवळपास तासभर ऑस्ट्रेलियाला स्पिनचे धडे दिले.प्रॅक्टिस् सेशनदरम्यान फक्त स्पिनर्सचं नाही तर फास्ट बॉलर्सनंही कसून सराव केला पण फक्त बॉलिंगचाच नाही तर कठीण प्रसंगात आपल्या टीमच्या स्कोरमध्ये भर कशी घालायची, याचासुद्धा. कारण मॅचच्या पाचव्या दिवशी झहीर खाननं जी तारांबळ उडवली होती ती ऑस्ट्रेलियन टीम अजून विसरलेली नाही. एकूणच फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाचा सामना करण्यासाठी ऑसी संघ कसून तयारी करत आहे पण त्यांच्या या तयारीचा प्रत्यक्ष मैदानावर किती फायदा होतो, याचं उत्तर फिरोजशहा कोटला मैदानावरच मिळेल.

close